Friday 15 April 2011

प्रथम प्रकरण

स्पर्धा जिंकून फार-फार तर आठवडाच झाला होता. दुपारी संगणकावर F1चा खेळ खेळत असताना माझा मोबाईल वाजला. नवीन नंबर होता. मी फोन उचलला. फोन एन्स्पेटर जाधव यांचा होता. हे जाधव मुंबईत कामाला. त्यांना एक गुन्हा सोडवायला माझी मदत हवी होती. मी तात्काळ होकार दिला. त्यांनी प्रकरणाबद्दल सांगायला सुरुवात केली. वडाळा पश्चिमेला श्री. शिवराज पाटील म्हणून होते. त्यांच्या घरात R१५,००,०००ची चोरी झाली होती. हे पाटील दिसायला सभ्य असले तरी त्यांच्या वरपर्यंत ओळखी होत्या. त्यामूळेच २४ तासांच्या आतच पोलीसांवर दबाव यायला सुरुवात झाली होती. याला कंटाळून जाधव यांनी मला फोन केला. त्यांना माझा नंबर वरिष्ठांनी दिला. त्यांचे बोलणे ऎकल्यावर मी त्यांना मदत करायला होकार दिला व दुसर्या दिवशी येवून घराची तपासणी करू असे सांगीतले.
दुसर्या दिवशी दिवशी सांगितल्याप्रमाणे पाटील यांच्या घरी पोहचलो. त्यांचे घर दुसर्या मजल्यावर होते. घराला ८ फूट उंचीचे व ५ फूट रुंदीचे मजबूत लोखंडी दार होते. पण याच दाराचे लॊक उचकटले होते. हॊलमध्ये खूप पसारा होता. मी थोडे तपासल्यासरखे करून आतमध्ये गेलो. आतल्या एका खोलीत गोदरेजचा मोठा लॊकार होता. या लॊकरचे लॊक कापले होते. मी लॊकरची तपासणी केली. त्यात मला काही पुरावे सापडले. हे पुरावे पोलीसांना दिसले नव्हते.
जाधव आणि पाटील यांच्याकडे थोडी चॊकशी करून हॊलमध्ये आलो. तिथे कुमार हवालदार होता. त्याच्याकडे बघून मला चोर सापडला. बाहेर आल्यावर एन्स्पेटर जाधव यांनी “काही सापडल का ?” म्हणून विचारल. मी सांगितल चोर सापडला. माझ्या उत्तराने ते तीन ताड उडालेच. खूष होवून श्री. जाधव यांनी चोर कोण आहे, असे विचारले. मी लगेच हवालदार कुमारकडे बोट दाखवले. हे उत्तर त्याला अनपेक्षीत होते. पोलीस असल्याने त्याने लगेच पुरावा मागितला. मी लगेच खिशातून काही लाकडची तूस काढली. या तुसांचा रंग पोलिसांच्या काठीशी मिळता-जुळता होता. आणि कुमार यांच्या काठीचा पुढचा भाग देखील कुठेतरी अडकल्यावर खेचून काढल्यावर व्हावा, तसा झाला होता. हे बघितल्यावर कुमारचा चेहरा थोडा पडला. नंतर मी एक चांदणीच्या आकाराचा एक बिल्ला काढला. हा बिल्ला पोलीसांच्या शर्टाचा असल्याचे जाधव यांनी लगेच ओळखले. मी त्यांना कुमारचा एक बिल्ला गायब असल्याचे सांगितले. आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच कुमारने लगेच चोरी कबूल केली.
माझ्या पुराव्याने पाटील व जाधव खूष झाले. जाता जाता इ.जाधव हळूच मला म्हणाले, “परत मदत लागल्यास नक्की कळवीन व तुला काही मदत लागल्यास मला नक्की सांग.”

Thursday 14 April 2011

खून की आत्महत्त्या ?

साधारण दुपारची वेळ होती. जेवण झाल्यावर मी मेल चेक करत होतो. एकाने सांगितल की ,“Hotel Tajमध्ये शेरलॊक होल्म्सच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्पर्धा होणार आहेत.” मी शेरलॊक होल्म्सचा निस्मिम भक्त. त्यावर कार्यक्रम म्हटल्यावर मी जाणरच. मी लगेच होल्म्सची वेब-साईट चेक केली. बातमी खरी होती. ताज हॊटेलमध्ये त्यांनी स्पर्धांचे आयोजन केले होते. तारिख १५ एप्रिल, २०११. वेळ होती सकाळी ११ ते दुपारी . वेब-साईटवर स्पर्धेचा फॊर्म भरला. प्रवेश नि:शुल्कच होता.
मेगाब्लोक असल्याने मी थोडा लवकरच गेलो. हॊटेलमध्ये स्पर्धेसाठी जवळजवळ ५०० जण आले होते. स्पर्धेच स्वरूप सोपे होते. एका खोलीत सर्व रचना केली होती. आत जावून निरिक्षण करून आपले अनूमान नोंदवाचे होते. एक-एक करून सर्व आत जात होते आणि अनुमान सांगून दुसर्या दाराने बाहेर जात होते. माझा १२९वा नंबर होता.
२वाजता माझा नंबर आला. खोली खूप मोठी होती. दारातून आत गेल्यावर मोठा पॅसेज होता. तो पार केल्यावर उजव्या बाजूला x२चा x फूट लाबींचा राजेशाही पलंग होता. पण स्पर्धा असल्याने तो मोठा पलंग दिसण्या आधी खोलीत मध्यभागी टांगलेला मृतदेह मला आधी दिसला. माझ्याबरोबर आलेल्या पर्यवेक्षकांनी मला १५मिनिटांत खोलीच निरिक्ष्ण करायला सांगितल. खोली फार मोठी नव्हती. १०मिनिटांतच निरिक्षण करून, अनुमान नोंदवून दुसर्या दाराने बाहेर पडलो.
साधारण .३०वाजता स्पर्धा संपली. सगळे स्पर्धक निकालाची वाट बघत होते. शेवटी निकलाची वेळ आलीच. परिक्षकांनी सांगितल की, ५००पॆकी २००जण आले होते. त्यातले १९९ जणांनी आत्महत्या असल्याचे सांगितले. पण एकाचे मत खून असे होते. असे मत फक्त माझेच होते. परिक्षकांनी मला बाजूला बोलावून कारण विचारले. मी त्यांना त्या खोलीत घेवून गेलो आणि कारण सांगायला सुरूवात केली. पलंगावरची चादर चूरगळलेली होती पण कोपर्यावर गादी जास्त दबली होती. याचा अर्थ मयत माणूस मृत्यूआधी बराच वेळ बसला होता. पलंगा समोरच्या गालीच्यावर बूटांचे ठसे होते. पण अख्या खोलीत एकही बूट नव्हता. याचा अर्थ दुसरा एक माणूस त्या खोलीत होता. शिवाय बाथरूमच्या दाराजवळ दोन सिगार होल्डर होते. आता एक जण दोन होल्डर थोडी वापरणार ? आणि महत्त्वाचा मुद्दा, मृत शरिराचे हात बांधले होते. हात बांधून कोणीच स्वःताची मान फासात घालूच शकत नाही. या वरून आत्महत्याच असल्याचे सिद्ध होते. पर्यवेक्षक मझ्या उत्तराने खूष झाले. शेवटी मलाच विजयी म्हणून घोषित केल. प्रमूख पाहूणे होते डी. शिवानंदन(मुंबई पोलिस दलाचे संचालक) त्यांनीच मला बक्षिस दिले. जाताना त्यांचे शब्द माझ्या कानावर आले, “ये लडका मुंबई पोलिसके कुच काम का हॆ .”