Friday 13 May 2011

छापखाना

उघडल्यावर एक तरूण आत आला. त्याला माझ्याशी काही महत्वाच बोलायच होत. मी त्याला पाणी हवय का? म्हणून विचारल. थोड पाणी पिऊन त्याने सांगायला सुरूवात केली.
माझ नाव सागर मराठे. मी डिप्लोमा केला आहे. माझ वाशीत प्रिंटींग मशीन विकण्याच आणि दुरुस्त करण्याच दुकान आहे. बर्याच मोठ्या कंपन्यांच्या printersची काम माझ्याकडे आहेत. हे थोड माझ्याबद्दल सांगून मुद्द्याच बोलायला सुरूवात करतो. परवा सकाळची गोष्ट. मी नुकतच दुकान उघडल होत आणि मागचे काही records तपासत होतो. त्याचवेळी एक माणूस दुकानात आला. साधारण ४५ ते ५० दरम्यानचा असावा. त्यान त्याच नाव हरिकुमार अस सांगितल सकाळची वेळ होती. घरात मी एकटाच होतो. पेपर वाचत होतो. त्याचवेळी दाराची बेल वाजली. दार. त्याचा वावडा या गावी छपायी कारखाना आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून त्याचे प्रींटर्स बंद आहेत. त्याची दुरूस्ती करायला त्याला माझी मदत हवी होती. बदल्यात तो तासाचे R,००,००० तसेच प्रवास भाडे देणार होता. एवढे पॆसे मिळणार म्हणून मी तयार झालो.
त्याच्या सांगण्यानुसार पनवेलहून रात्री वाजता वावड्याला जाणारी ट्रेन आहे. त्याचा छापखाना ६ किमी असल्याने स्टेशनवर तो स्वतः मला गाडीने घ्यायला येणार होता. त्यानुसार मी त्या ट्रेनने ९ वाजता वावड्याला पोहचलो. स्टेशनबाहेर तो गाडी घेवून तयारच होता. मला नंबर नक्की सांगता येणार नाही. गाडी अगदी ऎसपॆस होती. गाडी चांगालीच वेगाने चालली होती. रस्त्यावर गर्दी अजीबात नव्हती. माझ्या अंदाजानुसार आम्ही ५ मिनीटांत पोहचणार होतो. पण आम्हाला पोहचायला तब्बल अर्धा तास लागला.
शेवटी आम्ही पोहचलो एकदाचे. ज्या ठिकाणी आलो ती जागा खूप मोठी होती. तिथे घेवून येणारा हरिकुमारने मला आत नेले. मी त्याचा प्रिंटर बघितला. कागद भरायच्या जागी कचरा झाला होता. मी तो साफ केला. पण मला तो वेगळा वाटला. कारण कमी प्रकाशातसुद्धा तो चमकत होता. अगदी चांदीसारखा! माझ काम झाल्यावर हरिकुमार मला त्यांच्या केबिनमध्ये घेवून गेले. माझ दीड तासात झाल होत. त्यानुसार मला R१,५०,००० मिळाले. नंतर त्यानी मला एक सरबत प्यायला दिल. लिंबू-सरबत होत ते. पण ते प्यायल्यावर मला चक्क गाढ झोप लागली. मी उठलो तेव्हा १२.३० वाजले होते आणि मी वावडा स्टेशन्वर होतो. मला काहीच कळत नव्ह्त. शेवटी विचार केला आणि तुझ्याकडे आलो.”
त्याच बोलण ऎकून मी त्याला घ्यायला आलेल्या गाडीबद्दल विचारल. तो म्हणाला “गाडी अगदी नवी होती. पण तिचा काचा खूप गडद होत्या. त्यातून बोहेरच काहीच दिसत नव्हत.” मग मी त्याला काही संशयास्पद वाटल का? अस विचारल. त्यावर त्याने सांगितल की काम करताना त्याला दोनदा रेल्वेचा हॉर्न ऎकायला आला. त्याच्या उत्तरावरून माझा संशय खरा ठरला. मी त्याला खायला दिल आणि थोडा वेळ थांबायला सांगितल. मी लगेच तयार झालो आणि माझा पोलिसखात्यात मित्र असलेल्या इन्स्पेटर जाधवला फोन केला. तो म्हणाला, “आपण लगेच तिकडे निघुया. तुम्ही दोघ, मी आणि दोन कॉन्सेबल असे पाच जण लगेच निघूया. तासाभरात तुम्ही स्टेशनवर पोहचा.”
त्याच्या सांगण्यावरून आम्ही स्टेशनवर पोहचलो. ते तिघ तयारच होते. गाडीत बसलो आणि तासाभरात वावड्यला पोहचलो. स्टेशनवर पोलिसांची गाडी तयार होती. गाडीत बसल्यावर सगळ्यांची कुठल्या दिशेने जायचे यावर चर्चा सुरू झाली. चॊघांनी चार दिशा सांगितल्या. शेवटी जाधवने मला विचारल. मी म्हणल, “गाडीची काहीच गरज नाही. छापखाना स्टेशनच्या जवळच आहे. कारण सागरला दोनदा ट्रेनचा हॉर्न ऎकायला आला होता.” सगळ्यांना ते पटल. जवळपास चॊकशी केल्यावर जवळच एक बिल्डींग असल्याचे समजले.
पोलिस आल्याचे बहुदा हरिकुमारने पाहिले असावे. कारण बिल्डिंगजवळ पोहचल्यावर आमच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. उत्तरादाखल जाधवने खिडकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्या एखाद्या धातूवर आपटल्या असाव्यात. २ सेकंद शांततेत गेली. आणि…
आणि एक जोरदार स्फोट झाला. आम्ही त्यातून कसेबसे निसटलो. अग्निशनदलाला ती आग विझवायला ४ तास लागले. जानकारांनी सांगितल की ती आग जनरेटरच्या स्फोटाने झाली. बिल्डींगच्या ढिगार्यात एक बॉक्स सापडला. त्यात १०००च्या नोटा होत्या. RBI ने त्या नकली असल्याचे सांगितले. या घटनेचा पोलिसांनी खालीलप्रमाणे पंचनामा केला – “पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जनरेटरचा स्फोट होवून इमारतीला आग लागली. या इमारतीत नकली नोटा छापण्याचा छापखाना होता. इमारतीत कामाला असलेली तीन माणसे जळून ठार झाली.”

3 comments: